जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा पालकमंत्री नितेश राणेंची ग्वाही

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा  पालकमंत्री नितेश राणेंची ग्वाही
“

पंचनामे सरसकट,मदतही सरसकट मिळणार आहे

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ✍️जिल्हा ट्रिगर झोनमध्ये समाविष्ट झाल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. शेतकऱ्यांच्या मदतीबाबत कोणताही दुजाभाव केला जाणार नाही. सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

शेतकऱ्यांना आवश्यक असलेली मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून पुढील कार्यवाही केली जाईल. पंचनामे सरसकट करण्याची मागणी मान्य केली जाणार असून, पिकांच्या नुकसानीचा आढावा घेऊन मदतीची प्रक्रिया पुढे सुरू ठेवली जाईल, पंचनामे करण्याची मुदत वाढविण्याची आवश्यकता असेल तर तोही निर्णय घेतला जाईल असे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

केवळ नैसर्गिक संकटाच्या काळात आर्थिक मदत देण्यापुरते मर्यादित न राहता, भविष्यातील संकटांचा सामना करण्यासाठी सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात बारामतीच्या कृषी तंत्रज्ञानाच्या सहकार्याने आंबा आणि काजू उत्पादकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून मार्गदर्शन करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आंबा-काजू बागायतदारांना योग्य मार्गदर्शन करून उत्पादनवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. हवामानातील बदलांचा शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अधिक सक्षम करणे, त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आणि उत्पादनासाठी केवळ नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून राहण्याची गरज कमी करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सरसकट मदत आणि दीर्घकालीन शेती विकासासाठी एआय तंत्रज्ञान, अशा दोन्ही पातळ्यांवर सिंधुदुर्गात प्रयत्न सुरू आहेत. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी व्हावेत, यासाठी जिल्ह्याला कृषी विकासाचे मॉडेल बनविण्याचा प्रयत्न असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT