जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
“

सन २०२४-२५ व २०२५-२६ या दोन वर्षांच्या पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️:महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत सन २०२४-२५ व सन २०२५-२६ या वर्षांसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू तसेच साहसी उपक्रमांत सहभागी झालेल्या खेळाडू व व्यक्तींनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यातील उत्कृष्ट क्रीडापटू आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागामार्फत शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात येते. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, महिला क्रीडा मार्गदर्शकांसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार, खेळाडूंसाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, तसेच साहसी उपक्रम आणि दिव्यांग खेळाडूंसाठीच्या पुरस्कारांचा समावेश आहे.

शासनाच्या दि. २९ डिसेंबर २०२३ व दि. २५ जानेवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची सुधारित नियमावली, २०२३ निश्चित करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार पुरस्कारांसाठी दि. १२ ऑक्टोबर २०२६ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

पात्र इच्छुकांनी क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर २०२६ असून, त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे संबंधितांनी मुदतीत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT