जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक
“

जिल्हा कारागृहात कैद्यांच्या मानसिक आरोग्याविषयी जनजागृती

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: जागतिक मानसिक आरोग्य दिन सप्ताहानिमित्त १० ते १६ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘मन जागृती’ राष्ट्रीय मानसिक आरोग्य जनजागृती अभियानांतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ओरस येथील जिल्हा कारागृह क्रमांक १ मध्ये ‘कैदी आणि मानसिक आरोग्य’ या विषयावर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमात क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट रेश्मा भाईप यांनी कैद्यांच्या मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कारागृह प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्हा रुग्णालयातील मनोरुग्ण परिचारिका श्रीमती कावले आणि श्रीमती वरदम उपस्थित होत्या.

मार्गदर्शन करताना रेश्मा भाईप म्हणाल्या की, मानसिक आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्याची काळजी घेणेही आवश्यक आहे. कैदी म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर तुरुंगाच्या भिंती, बंद दरवाजे, शिक्षा आणि गुन्हेगारीची चित्रे उभी राहतात; मात्र या भिंतींच्या आतही भावना, आशा, स्वप्ने, कुटुंबाविषयी प्रेम आणि भविष्याबद्दल चिंता असलेली व्यक्ती असते.

कारागृहातील जीवनामुळे अनेक व्यक्तींना एकटेपणा, नैराश्य, अपराधीपणाची भावना, राग, भीती आणि मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत कैद्यांना योग्य मानसिक आधार, समुपदेशन आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष न करता त्याविषयी मोकळेपणाने संवाद साधणे आणि गरजेनुसार तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी ‘भूतकाळ बदलता येत नाही; पण वर्तमानातील प्रयत्नांतून भविष्य घडवता येते’ हा सकारात्मक संदेश देण्यात आला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT