जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सावंतवाडीतील पथविक्रेत्यांनी ‘पीएम स्वनिधी’ योजनेचा लाभ घ्यावा

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सावंतवाडीतील पथविक्रेत्यांनी ‘पीएम स्वनिधी’ योजनेचा लाभ घ्यावा
“

उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे आवाहन; टप्प्याटप्प्याने मिळणार १५, २५ आणि ५० हजारांचे कर्ज

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: शहरातील पथविक्रेते आणि फेरीवाल्यांना आर्थिक बळ मिळावे, तसेच त्यांचा व्यवसाय अधिक सक्षमपणे उभा राहावा, यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून केंद्र सरकारची ‘पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’ (पीएम स्वनिधी) योजना राबविण्यात येत आहे. शहरातील अधिकाधिक पात्र पथविक्रेत्यांनी या योजनेत सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे.




योजनेचा अर्ज भरताना पथविक्रेत्यांना अडचणी येऊ नयेत आणि आवश्यक मार्गदर्शन मिळावे, यासाठी नगरपरिषद कार्यालयात स्वतंत्र मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे. या योजनेत सुरुवातीला पात्र लाभार्थ्यांना १५ हजार रुपयांचे कर्ज दिले जाते. हे कर्ज एक वर्षाच्या कालावधीत नियमितपणे परतफेड केल्यास केंद्र सरकारकडून सात टक्के व्याज अनुदान मिळते.




पहिल्या टप्प्यातील कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यात दोन वर्षांच्या मुदतीसह २५ हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या कर्जाचीही नियमित परतफेड केल्यानंतर पुढील टप्प्यात ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची सुविधा आहे.




योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पथविक्रेते व फेरीवाल्यांनी अर्जासोबत आधार कार्ड, पॅन कार्ड आणि रेशन कार्ड ही कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेमुळे लहान व्यावसायिकांना भांडवल उपलब्ध होऊन व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत होत आहे.




त्यामुळे सावंतवाडी शहरातील पात्र पथविक्रेत्यांनी नगरपरिषदेच्या कार्यालयातील विशेष कक्षाशी संपर्क साधून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी आणि ‘पीएम स्वनिधी’ योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT