जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सावंतवाडीत एकाच विकासकामाचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सावंतवाडीत एकाच विकासकामाचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
“

सकाळी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या हस्ते शुभारंभ, तर काही तासांतच नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या उपस्थितीत पुन्हा भूमिपूजन; ६० लाखांच्या निधीवरूनही चर्चा

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: विकासकामांचे श्रेय घेण्यावरून राजकीय पक्षांमध्ये सुरू असलेली चढाओढ आता सावंतवाडीत वेगळ्याच पातळीवर पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळाले. नगरपरिषद हद्दीतील कळसुलकर हायस्कूल ते निंबाळकर पीरकडे जाणारा नाला बंदिस्त करण्याच्या एकाच कामाचे अवघ्या काही तासांच्या अंतराने दोनदा भूमिपूजन करण्यात आले. सकाळी भाजपच्या नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्या हस्ते झालेल्या भूमिपूजनानंतर काही वेळातच शिवसेनेचे नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या उपस्थितीत पुन्हा त्याच कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.




सकाळी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांनी नगरसेवकांसमवेत या नाला बंदिस्तीच्या कामाचे विधिवत भूमिपूजन केले. मात्र, त्यानंतर काही तासांतच नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा त्याच कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या दुसऱ्या कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी नगरविकास खात्याकडून या कामासाठी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याची माहिती देण्यात आली. याबद्दल उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार दीपक केसरकर यांचे नगरसेवक सूर्याजी यांनी आभार मानले.




या नाल्याची बंदिस्ती झाल्यास परिसरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. तसेच वाहतुकीची कोंडी कमी होण्यासही मदत होणार असल्याने हे काम महत्त्वाचे मानले जात आहे.




दुसऱ्या भूमिपूजन सोहळ्यावेळी नगरसेविका शर्वरी धारगळकर, ज्येष्ठ नागरिक शिरवलकर, प्रसाद वागळे यांच्या हस्ते गाऱ्हाणे घालून आणि श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सौ. शिरवलकर, सौ. वागळे, श्रेयस मूंज, प्रवीण देऊलकर, सागर मठकर, गणेश कुडव, अक्षय शिरवलकर, यल्लापा दोडमणी, पियुष राठोड, कंत्राटदार निमिष परांजपे यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




एकाच विकासकामाचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन झाल्याने या कामाचे श्रेय नेमके कोणाला, असा प्रश्न उपस्थित होत असून सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळासह नागरिकांमध्येही या प्रकाराबाबत उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्गात उद्या ‘नशामुक्त युवा’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
सामाजिक

दोडामार्गात उद्या ‘नशामुक्त युवा’ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा परिषदेत प्रशासन-सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव; जनतेच्या प्रश्नांसाठी अपक्ष म्हणून लढणार : रुपेश पावसकर
राजकीय

जिल्हा परिषदेत प्रशासन-सत्ताधाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव; जनतेच्या प्रश्नांसाठी अपक्ष म्हणून लढणार : रुपेश पावसकर

युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर; कणकवलीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
राजकीय

युवासेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यावर भर; कणकवलीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक

कोकणच्या संस्कृती, परंपरा आणि खाद्यवैभवाचे जोगेश्वरीत दर्शन!
सांस्कृतिक

कोकणच्या संस्कृती, परंपरा आणि खाद्यवैभवाचे जोगेश्वरीत दर्शन!

ANCHOR AD SLOT