जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सिंधुदुर्गात अल्पसंख्याक काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीकरणावर चर्चा

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सिंधुदुर्गात अल्पसंख्याक काँग्रेसच्या संघटनात्मक बळकटीकरणावर चर्चा
“

कोकण विभागीय अध्यक्ष यासीर अरफात बुबेरे यांच्या जिल्हा दौऱ्यात कुडाळमध्ये बैठक; सावंतवाडीत विविध मान्यवरांच्या घेतल्या सदिच्छा भेटी

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️: अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार नवनियुक्त कोकण विभागीय अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष यासीर अरफात बुबेरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यादरम्यान कुडाळ एमआयडीसी येथे अल्पसंख्याक काँग्रेसची संघटनात्मक बैठक उत्साहात पार पडली.




या बैठकीला महिला जिल्हाध्यक्ष साक्षी समीर वंजारी, नवनियुक्त सिंधुदुर्ग जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष तौकीर भाई शेख, कुडाळ तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, जिल्हा उपाध्यक्ष विजय प्रभू, ज्येष्ठ काँग्रेस नेते बाब्या मापसेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष अभय मालवणकर, काँग्रेसचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते अन्वर खान सर, तबरेज यांच्यासह कुडाळ तालुक्यातील अल्पसंख्याक काँग्रेसचे पदाधिकारी आणि युवा कार्यकर्ते उपस्थित होते.




बैठकीमध्ये अल्पसंख्याक विभागाचे संघटनात्मक बळकटीकरण, काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा अधिकाधिक प्रसार आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटनेशी जोडून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात पक्षाची संघटना अधिक सक्रिय आणि मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.




या बैठकीनंतर सावंतवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच उभाबाजार येथील मशिदीमध्ये ज्ञाती बांधवांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.




यावेळी माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड. समीर वंजारी यांच्या काँग्रेस संपर्क कार्यालयालाही सदिच्छा भेट देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी नवनियुक्त कोकण विभागीय अल्पसंख्याक काँग्रेस अध्यक्ष यासीर अरफात बुबेरे यांनी भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष तौकीर शेख, पीटर परेरा आणि महिला जिल्हाध्यक्ष साक्षी समीर वंजारी उपस्थित होते. या भेटीदरम्यान पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीसंदर्भात चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.




नवीन नियुक्त्यांच्या माध्यमातून कोकण विभागात काँग्रेस संघटना अधिक सक्षम, सक्रिय आणि एकजुटीने उभी करण्याचा निर्धार या दौऱ्याच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT