जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

हत्तींच्या प्रश्नावर ३० वर्षांत ३०० कोटी खर्चूनही तोडगा नाही; मग विरोधकांनी बोलायचे तरी नाही का? – परशुराम उपरकर

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

हत्तींच्या प्रश्नावर ३० वर्षांत ३०० कोटी खर्चूनही तोडगा नाही; मग विरोधकांनी बोलायचे तरी नाही का? – परशुराम उपरकर
“

माजी पालकमंत्र्यांनाही जाब विचारा; शेतकरी-बागायतदारांना दिलासा देण्यासाठी प्रश्न तातडीने सोडवा

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा प्रश्न गेल्या पंचवीस ते तीस वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहे. या कालावधीत अनेक पालकमंत्री झाले; मात्र कोणालाही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढता आलेला नाही. हत्तींच्या प्रश्नावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही परिस्थिती जैसे थे असेल, तर विरोधकांनी या विषयावर आवाज उठवायचा नाही का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी उपस्थित केला आहे.




यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात उपरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हत्तींच्या प्रश्नात राजकारण करू नये, हा संवेदनशील विषय आहे आणि यापूर्वीच्या पालकमंत्र्यांनी काय केले, असा सवाल विद्यमान पालकमंत्री करत आहेत. मात्र गेल्या पंचवीस ते तीस वर्षांतील परिस्थिती पाहिली, तर विद्यमान खासदार नारायण राणे, त्यानंतर उदय सामंत, दीपक केसरकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण यांनीही जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. आज हे सर्वजण सत्तेत असून विद्यमान पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत सत्तेत आहेत. त्यामुळे या सर्व माजी पालकमंत्र्यांनी आपल्या कार्यकाळात हत्तींचा प्रश्न सोडविण्यासाठी काय केले, असा जाब विद्यमान पालकमंत्र्यांनी त्यांना विचारायला हवा, असे उपरकर यांनी म्हटले आहे.




हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक उपाययोजना करण्यात आल्या. त्यामध्ये खंदक खोदणे, मसाल्याचे दोरखंड वापरणे, हत्तींना ट्रँग्युलाइज करणे, हत्ती ग्राम घोषित करण्याचा प्रस्ताव, इलेक्ट्रिक कंपाउंड उभारणे अशा विविध उपायांचा समावेश आहे. मात्र, या सर्व उपाययोजनांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च होऊनही हत्तींचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. सुमारे ३०० कोटी रुपयांच्या आसपास खर्च होऊनही जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव कायम असल्याचा दावा उपरकर यांनी केला आहे.




जिल्ह्यात दररोज हत्तींकडून सर्वसामान्य शेतकरी, नागरिक आणि बागायतदारांचे नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी या प्रश्नावर आवाज उठवू नये, अशी अपेक्षा कशी ठेवता येईल? गेल्या तीन दशकांहून अधिक काळ सत्तेत असलेल्या लोकप्रतिनिधींना आणि पालकमंत्र्यांना हा प्रश्न सोडविता आलेला नाही. त्यामुळेच या विषयाचे राजकारण करू नये, अशी भूमिका घेतली जात असल्याचे उपरकर यांनी पत्रकात नमूद केले आहे.




हत्तींच्या प्रश्नावर केवळ चर्चा आणि वेगवेगळ्या उपाययोजना करण्याऐवजी आता तरी सत्ताधाऱ्यांनी ठोस निर्णय घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा. हत्तींच्या उपद्रवामुळे आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या शेतकरी आणि बागायतदारांना दिलासा द्यावा, अशी मागणीही माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!
सामाजिक

कणकवलीत २९ नोव्हेंबरला रंगणार ‘किलबिल जल्लोष’; चिमुकल्यांसाठी मनोरंजनाची अनोखी पर्वणी!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

ANCHOR AD SLOT