सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील अंमलदारांना पदोन्नती देऊन त्यांच्या सेवाकार्याचा गौरव करण्यात आला. पोलीस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या शुभहस्ते पदोन्नतीप्राप्त अंमलदारांना पदोन्नती प्रदान करण्यात आली.
यामध्ये मपोहवा/४६१ काजोल काशिराम ढवळ यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर, तर पोना/१२०७ फ्रिडन बस्त्याव बुथेलो, पोना/१२१३ प्रदीप गजानन नाईक आणि मपोना/११६१ उज्वला काशिनाथ मांजरेकर यांना पोलीस हवालदार पदावर पदोन्नती देण्यात आली.
यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी पदोन्नतीप्राप्त अंमलदारांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पदोन्नतीमुळे संबंधित अंमलदारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
या कार्यक्रमाला पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते. सिंधुदुर्ग पोलीस दलातील पदोन्नतीप्राप्त सर्व अंमलदारांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.