जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्याचे माणुसकीचे दर्शन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या सदस्याचे माणुसकीचे दर्शन
“

दुर्मिळ ‘बी निगेटिव्ह’ रक्तगटासाठी संजय ठक्कर यांचे रक्तदान

कुडाळ प्रतिनिधी ✍️:प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेला दुर्मिळ अशा ‘बी निगेटिव्ह’ रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता भासली असता,सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य आणि नियमित रक्तदाते संजय ठक्कर (कुडाळ) यांनी तत्परता दाखवत रक्तदान केले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे गरजू रुग्णाला मदतीचा मोलाचा हात मिळाला आहे.

दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सोनाली गोरली (कुडाळ) यांना प्रसूतीसाठी महिला व बाल रुग्णालय,कुडाळ येथे दाखल करण्यात आले होते.यावेळी त्यांच्यासाठी दुर्मिळ ‘बी निगेटिव्ह’ रक्तगटाच्या रक्ताची आवश्यकता होती.अशा वेळी रक्ताची गरज लक्षात घेऊन संजय ठक्कर यांनी तातडीने पुढाकार घेत जिल्हा रुग्णालय रक्तपेढी,सिंधुदुर्ग येथे रक्तदान केले.

विशेष म्हणजे,संजय ठक्कर यांचे हे १० वे रक्तदान असून, यापूर्वीही त्यांनी गरजू रुग्णांसाठी तत्परतेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे.दुर्मिळ रक्तगटाचे रक्त मिळणे अनेकदा आव्हानात्मक ठरते.अशा परिस्थितीत वेळेवर रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याचे योगदान रुग्णासाठी अत्यंत मोलाचे ठरते.या रक्तदानासाठी सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य सचिन गुंड यांच्यासह अन्य संबंधितांनी प्रयत्न केले. संकटाच्या प्रसंगी धावून जाणे, गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेणे आणि रक्तदानातून माणुसकी जपणे,हीच सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानची सामाजिक कार्याची परंपरा आहे.संजय ठक्कर यांनी दाखविलेल्या या तत्परतेबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून,त्यांच्या कार्याला ‘सिंधुसलाम!’ देत प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.रक्तदान हेच जीवनदान! एका रक्तदात्याच्या पुढाकारातून एखाद्या कुटुंबाला मोठा आधार मिळू शकतो,याचेच हे प्रेरणादायी उदाहरण आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT