जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

साताऱ्यातील विजयादशमी सोहळा साधेपणाने

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

साताऱ्यातील विजयादशमी सोहळा साधेपणाने
“

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

पुणे शहरात आजपासून आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू करण्यात आली आहे. पुणे महापालिकेने दर गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयामुळे पुणेकरांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दुसरीकडे, नाशिक महापालिकेनेही शहरासाठी आणि कुंभमेळ्यासाठी मिळून सुमारे ८ टीएमसी पाण्याची मागणी केली आहे. १५ ऑक्टोबरनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या संर्दभातील बैठक होणार आहे.

साताऱ्यातील विजयादशमी सोहळा साधेपणाने राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील ऐतिहासिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा अत्यंत साधेपणाने साजरा केला जाणार आहे. दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींचे भान राखत जलमंदिर पॅलेस येथील शाही सोहळ्यातील झगमगाट टाळण्याचा महत्त्वाचा निर्णय खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे.

सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज होती. प्रत्यक्षात दिवाळीपूर्वी अवघ्या पाच हजार रुपयांची मदत जाहीर करून राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT