जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पालक सचिव विरेंद्र सिंह यांची वेंगुर्ला तालुक्यात विविध ठिकाणी पाहणी

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पालक सचिव विरेंद्र सिंह यांची वेंगुर्ला तालुक्यात विविध ठिकाणी पाहणी
“

लोकसहभागातून राबविलेल्या जलसंधारणाच्या कामांचे केले कौतुक आरोग्य सेवा, ग्रामपंचायत व नगरपरिषदेच्या कामकाजाचा घेतला आढावा; नागरिकांना जलद सेवा देण्याचे निर्देश

सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️: शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच नागरिकांना वेळेत आणि सुलभपणे सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा. स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करून नागरिकांच्या अपेक्षा व गरजांना प्राधान्य द्यावे. तसेच लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या विकासकामांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह (भाप्रसे) यांनी केल्या.




वेंगुर्ला तालुक्याच्या दौऱ्यात त्यांनी विविध ठिकाणी भेटी देऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, जलसंधारणाची कामे तसेच नगरपरिषदेच्या सुविधांची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामकाजाची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.




प्राथमिक आरोग्य केंद्र तुळसची पाहणी




पालक सचिव विरेंद्र सिंह यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तुळस येथे भेट देऊन विविध आरोग्य सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांनी बाह्यरुग्ण विभाग, शीतसाखळी कक्ष, औषध भांडार, प्रसूतीगृह तसेच असंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्षाची पाहणी केली. विविध नोंदवह्यांची तपासणी करून आरोग्य केंद्रातील कामकाजाची माहिती त्यांनी घेतली.




आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा, उपलब्ध वैद्यकीय सुविधा आणि आरोग्यविषयक योजनांच्या अंमलबजावणीचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी लाभार्थ्यांना वयोवंदना कार्ड तसेच आभा कार्डचे वितरण करण्यात आले.




मातोंडमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाला चालना




त्यानंतर पालक सचिवांनी मातोंड ग्रामपंचायतीला भेट दिली. सरपंच मयूरी वडाचेपाटकर यांनी त्यांचे स्वागत केले. ग्रामसेवक प्रल्हाद इंगळे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपसरपंच वैभवी परब यावेळी उपस्थित होत्या.




मातोंड गावात ग्रामस्थ, बचत गट आणि शाळांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणावर वनराई बंधारे तसेच विविध जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. लोकसहभागातून उभारण्यात आलेली ही जलसंधारणाची चळवळ गावाच्या विकासासाठी उपयुक्त ठरत असल्याचे पालक सचिवांनी पाहणीदरम्यान नमूद केले.




यावेळी ग्रामस्थांनी पालक सचिवांचे स्वागत करताना, “तुम्ही आलात आणि पाऊस पडला,” असे म्हणत आनंद व्यक्त केला. ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध दाखल्यांचे वितरण पालक सचिवांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीतील सीएससी केंद्राला भेट देऊन तेथून नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या ऑनलाइन सेवांची माहिती त्यांनी घेतली.




सावंतवाडा येथील बंधाऱ्याची पाहणी




मातोंड ग्रामपंचायतीनंतर पालक सचिवांनी सावंतवाडा येथील बंधाऱ्याची पाहणी केली. पाणी अडविणे व जिरविणे, तसेच स्थानिक जलस्रोतांची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती त्यांनी संबंधितांकडून घेतली.




‘नमो उद्याना’च्या कामाचे कौतुक




वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या ‘नमो उद्याना’चीही पालक सचिवांनी पाहणी केली. उद्यानातील उपलब्ध सुविधा आणि करण्यात आलेल्या विकासकामांची माहिती घेतल्यानंतर त्यांनी कामाचे कौतुक केले. उद्यानाची उभारणी आदर्श पद्धतीने करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.




१५० वर्षांची परंपरा असलेल्या नगरपालिकेने प्रगतिशील कामांना प्राधान्य द्यावे




यानंतर पालक सचिवांनी वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालयाला भेट देऊन नागरिकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या विविध नागरी सेवांच्या वितरण प्रक्रियेचा आढावा घेतला. प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पालक सचिवांचे स्वागत केले.




नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरपरिषद सदस्य प्रशांत आपटे आणि मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी नगरपरिषदेच्या विविध कामकाजाची माहिती पालक सचिवांना दिली.




सुमारे १५० वर्षांची परंपरा असलेल्या वेंगुर्ला नगरपालिकेने बदलत्या काळानुसार प्रगतिशील उपक्रम हाती घेऊन प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करावे. नागरिकांना विविध नागरी सेवा जलद, सुलभ आणि प्रभावी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालक सचिव विरेंद्र सिंह यांनी दिल्या.




विकासकामांसोबतच नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची गुणवत्ता वाढविणे, त्यांच्या गरजांना प्राधान्य देणे आणि लोकसहभागातून शाश्वत उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचा संदेश पालक सचिवांच्या या दौऱ्यातून अधोरेखित झाला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT