जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पीएम-किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पीएम-किसानचा २४ वा हप्ता ३० ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यावर
“

राज्यातील ९१.१३ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार सुमारे १,८३५ कोटींचा लाभ

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीतील २४ व्या हप्त्याचे वितरण ३० ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील बनासकांठा येथून या हप्त्याचे वितरण होणार असून, या निमित्ताने देशभरात ३० ऑक्टोबर रोजी ‘पीएम-किसान उत्सव दिवस’ साजरा केला जाणार आहे.




शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्नाचा आधार मिळावा, या उद्देशाने केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये ही रक्कम लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा केली जाते.




राज्यातील पात्र शेतकरी कुटुंबांना आतापर्यंत पीएम-किसान योजनेच्या २३ हप्त्यांच्या माध्यमातून सुमारे ४२ हजार ९३५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. आता २४ व्या हप्त्यासाठी राज्यातील सुमारे ९१.१३ लाख शेतकरी कुटुंबे पात्र ठरली आहेत. त्यांना एकूण अंदाजे १ हजार ८३५ कोटी रुपयांचा लाभ थेट लाभ हस्तांतरणाच्या माध्यमातून ३० ऑक्टोबर रोजी त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये जमा केला जाणार आहे.




ई-केवायसी, आधार संलग्न खाते आणि भूमी अभिलेख अद्ययावत असणे आवश्यक




पीएम-किसानचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी भूमी अभिलेखातील नोंदी अद्ययावत ठेवणे, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे आणि ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. याशिवाय केंद्र शासनाने या योजनेच्या लाभासाठी ‘फार्मर आयडी’ असणेही अनिवार्य केले आहे.




योजनेबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी तसेच लाभार्थ्यांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. कृषी विभाग, महसूल व वन विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबविण्यात येतील.




कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावरील शासकीय कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समित्या, संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPCs), शेतकरी उत्पादक संघटना (FPOs) तसेच प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) येथे या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.




या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरून करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनी या थेट प्रक्षेपणाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT