जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पीएम किसान योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण
“

राज्यातील ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १,८३५ कोटी रुपये जमा

मुंबई प्रतिनिधी✍️: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेच्या २४ व्या हप्त्याचे वितरण आज गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित विशेष कार्यक्रमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दृकश्राव्य माध्यमातून सहभाग घेतला.




पीएम-किसान योजनेअंतर्गत देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हप्त्याची रक्कम थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने जमा करण्यात आली. महाराष्ट्रातील ९१ लाख १२ हजार ७६६ पात्र शेतकऱ्यांना या हप्त्यापोटी एकूण १ हजार ८३५ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.




राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना दिवाळीपूर्वी पीएम-किसानचा हप्ता खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळणार आहे. शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी या निधीचा उपयोग होणार असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार तसेच देशभरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT