पुणे लोकप्रतिनिधी✍️ मराठा सेवा संघ प्रणित, मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था आयोजित ‘ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पो २०२६’ च्या उद्घाटन सोहळ्याला मोशी, पुणे येथे मंत्री उदय सामंत उपस्थित राहिले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री श्री. प्रतापराव जाधव, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, BVG समूहाचे प्रमुख श्री. हनुमंतराव गायकवाड, मराठा सेवा संघाचे संस्थापक श्री. पुरुषोत्तम खेडेकर, आंतरराष्ट्रीय मराठा उद्योजक संघाचे अध्यक्ष श्री. संजय वायाळ, माजी आमदार श्री. विलास लांडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि उद्योजक बंधू-भगिनी उपस्थित होते.मराठी उद्योजकांनी आपल्या कर्तृत्वाच्या आणि नावीन्यपूर्ण कल्पनांच्या बळावर जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करावी. हनुमंतराव गायकवाड, गणेश निबे आणि भरत गीते यांसारख्या उद्योजकांचा संघर्ष आणि यश नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. मराठी माणूस उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान आणि जागतिक व्यवसायात कुठेही मागे नाही, हा आत्मविश्वास आपण जपला पाहिजे.तरुण आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जात आहे. उद्योजकांसाठी आवश्यक ते मार्गदर्शन, बँकांसह शासकीय यंत्रणेचे सहकार्य आणि उद्योगपूरक धोरणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे.मराठी उद्योजकांनी मोठी स्वप्ने पाहावीत, उद्योग उभारावेत, रोजगार निर्माण करावा आणि महाराष्ट्राचे नाव जगभरात उंचवावे. उद्योजकांच्या प्रगतीसाठी शासन त्यांच्या दारी येईल, हा शब्द यानिमित्ताने सामंत यांनी दिला.
मराठी माणसाने नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा उद्योजक बनावे उदय सामंत
व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा
फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
“
उद्योगपूरक धोरणे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध
दादा सारंग
लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.
संबंधित बातम्या
एक टिप्पणी द्या
संबंधित बातम्या
प्रशासन
सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन
वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन
४९ वर्षांची रुग्णसेवा, २५ वर्षे विनामूल्य तपासणी; डॉ. शीतल शहा यांचे कार्य प्रेरणादायी!
प्रशासन
दिवाळीच्या प्रकाशात जपूया पाण्याचा प्रत्येक थेंब!