जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

मुणगे समुद्रात अवैध पर्ससीन मासेमारी करणाऱ्या पाच नौका ताब्यात

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मुणगे समुद्रात अवैध पर्ससीन मासेमारी करणाऱ्या पाच नौका ताब्यात
“

‘ऑपरेशन शाश्वत सागर’अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाची धडक कारवाई

मालवण प्रतिनिधी✍️ : ‘ऑपरेशन शाश्वत सागर’अंतर्गत मत्स्यव्यवसाय विभागाने मुणगेसमोरील समुद्रात अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणाऱ्या पाच नौकांवर धडक कारवाई केली. यामध्ये एका मोठ्या नौकेसह चार लहान नौकांचा समावेश आहे. अंदाजे १० ते १२ वाव पाण्यात मासेमारी करताना या नौका आढळून आल्या. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम, २०२१ अंतर्गत संबंधित नौकांवर कारवाई करण्यात आली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.




ही कारवाई २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारच्या सुमारास करण्यात आली. देवगडचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी किरण वाघमारे आणि मालवणचे अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी गणेश टेमकर यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. सागरी सुरक्षा पर्यवेक्षक तसेच सुरक्षा रक्षकांनीही कारवाईत सक्रिय सहभाग घेतला. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई पार पडली.




मुणगेसमोरील समुद्रात नियमित गस्तीवर असलेल्या पथकाला काही नौका संशयास्पदरीत्या मासेमारी करताना आढळून आल्या. त्यांची तपासणी केली असता अवैध पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विभागाच्या पथकाने पाचही नौका ताब्यात घेतल्या.




कारवाई करण्यात आलेल्या नौकांमध्ये :




१) IND-MH-५-MM-४४२९ – अल मोहम्मदी-५ RR

२) IND-MH-५-MM-५४९३ – आमिन-१

३) IND-MH-५-MM-४१६३ – अल-बुराक RR

४) IND-MH-५-MM-५१०४ – फातिमा-२

५) फैजा या नौकेचा समावेश आहे.




मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या कठोर भूमिकेमुळे अवैध मासेमारीविरोधातील कारवाईला वेग आला असून, विभागाचे अधिकारी अधिक सतर्कतेने काम करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. अवैध मासेमारीवर वेळोवेळी प्रभावी कारवाई होत असल्याने स्थानिक मच्छिमार समुदायातून समाधान व्यक्त होत आहे.




दरम्यान, समुद्रातील अवैध मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून नियमित गस्त तसेच संयुक्त कारवाया सुरू ठेवण्यात आल्या आहेत. सागरी मासेमारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही नौकेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा विभागाने दिला आहे. भविष्यातही अशाच प्रकारच्या धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT