जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

महर्षी वाल्मिकींचे जीवन आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

महर्षी वाल्मिकींचे जीवन आत्मपरीक्षण आणि परिवर्तनाची प्रेरणा देणारे
“

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे; जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी ✍️: महर्षी वाल्मिकी यांचे जीवनकार्य आणि त्यांनी निर्माण केलेले साहित्य हे प्रत्येकाला आत्मपरीक्षण करून स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची प्रेरणा देणारे आहे. माणसाची खरी ओळख त्याच्या भूतकाळावर नव्हे, तर त्याचे विचार, कष्ट आणि कृती यावर ठरते, हा महत्त्वपूर्ण संदेश महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनातून मिळतो. रामायणातून मांडण्यात आलेली आदर्श मूल्ये आत्मसात करून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.




जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाबरोबरच भारतीय साहित्य, संस्कृती आणि समाजजीवनाला त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्यात आला.




या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




महर्षी वाल्मिकी यांना भारतीय साहित्यपरंपरेत ‘आदिकवी’ म्हणून विशेष मानाचे स्थान आहे. त्यांनी संस्कृत भाषेत रचलेल्या रामायण या महाकाव्यात सात कांडांमधून प्रभू श्रीरामांचे जीवन, त्यांची कर्तव्यनिष्ठा, त्याग, आदर्श आचरण आणि नैतिक मूल्यांचे प्रभावी दर्शन घडते. सुमारे २४ हजार श्लोकांचा समावेश असलेल्या या महाकाव्याचा भारतीय साहित्य, संस्कृती आणि समाजजीवनावर आजही व्यापक प्रभाव आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT