जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कसालमध्ये २२ नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबिर

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कसालमध्ये २२ नोव्हेंबरला भव्य कायदेविषयक सेवा शिबिर
“

प्रमुख जिल्हा न्यायाधीशांकडून आयोजनस्थळाची पाहणी

सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात रविवार, २२ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य कायदेविषयक सेवा शिबिराचे (Mega Legal Services Camp) आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यातील कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात हे शिबिर होणार असून, त्यासाठीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच आयोजनस्थळाची पाहणी केली.




उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती श्याम चांडक आणि न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती फरहान दुबाश यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्ह्यातील सर्व वकील संघ तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून ‘नाल्सा’च्या (NALSA) नवीन मॉड्यूलनुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.




शिबिराच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष यांच्या उपस्थितीत २२ ऑक्टोबर २०२६ रोजी कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसराची सविस्तर पाहणी करण्यात आली. शिबिरासाठी आवश्यक असलेल्या विविध सोयी-सुविधांचा तसेच उपलब्ध जागेचा आढावा घेतल्यानंतर हे ठिकाण निश्चित करण्यात आले.




या पाहणीवेळी जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली, कुडाळच्या उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (ग्रामपंचायत) परेश शिरसाट, मंडळ अधिकारी अशोक चव्हाण तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहायक कनिष्ठ अभियंता शिकांत शिंदे उपस्थित होते.




याशिवाय जिल्हा न्यायालयाचे अधीक्षक एम. आर. माणगांवकर, एस. डी. गिरकर, एन. एस. सावंत, सहायक अधीक्षक एस. एच. खेडेकर यांच्यासह न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन अवधुत मालणकर, सेक्रेटरी आशिष परब आणि मुख्याध्यापक उत्तम मळगावकर यांनीही पाहणीवेळी उपस्थित राहून शिबिराच्या नियोजनासाठी आवश्यक सहकार्य केले.




या भव्य कायदेविषयक सेवा शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना विविध कायदेविषयक सेवा, मार्गदर्शन आणि शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT