जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कलमठमध्ये ७ नोव्हेंबरला श्रीकृष्ण नरकासुर स्पर्धा

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कलमठमध्ये ७ नोव्हेंबरला श्रीकृष्ण नरकासुर स्पर्धा
“

संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त आयोजन

कणकवली प्रतिनिधी✍️: कलमठ संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या वतीने दिवाळीनिमित्त श्रीकृष्ण नरकासुर स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजल्यानंतर कलमठ बाजारपेठ येथे ही स्पर्धा रंगणार आहे.




स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमांकासाठी ६ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ४ हजार रुपये व सन्मानचिन्ह, तर तृतीय क्रमांकासाठी २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षिसेही ठेवण्यात आली असून, प्रत्येकी १ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे.




स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पात्रासाठी श्रीकृष्णाची वेशभूषा करणे बंधनकारक आहे. तसेच सर्व स्पर्धकांनी रात्री ११ वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणे आवश्यक आहे. रात्री ११ नंतर येणाऱ्या स्पर्धकांच्या गुणांमधून दोन गुण वजा करण्यात येणार आहेत.




स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नावनोंदणीसाठी तेजस लोकरे (९४२२१७९५९६), नितीन पवार (९४०४२१७०७७) आणि सचिन वाघेश्री (७७४१०००३७७) यांच्याशी संपर्क साधावा.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

ANCHOR AD SLOT