जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कोकणचे महाबळेश्वर असलेल्या माचाळमध्ये धावणार ‘लालपरी’!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कोकणचे महाबळेश्वर असलेल्या माचाळमध्ये धावणार ‘लालपरी’!
“

१ नोव्हेंबरपासून लांजा-माचाळ एसटी बससेवा सुरू; पर्यटन विकासाला मिळणार चालना

लांजा प्रतिनिधी✍️: कोकणचे महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांजा तालुक्यातील माचाळ या निसर्गरम्य थंड हवेच्या ठिकाणी आता एसटी महामंडळाची ‘लालपरी’ दाखल होणार आहे. रविवार, १ नोव्हेंबर २०२६ पासून लांजा ते माचाळ बससेवा सुरू करण्यात येत असून, या सुविधेमुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांची प्रवासाची सोय होणार आहे. माचाळच्या पर्यटन विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.




लांजा बसस्थानकातून सकाळी ८.३० वाजता बस माचाळच्या दिशेने रवाना होईल. सकाळी ९.३० वाजता ती माचाळ येथे पोहोचणार असून, तेथे मान्यवरांच्या हस्ते बससेवेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या बससेवेचा लाभ प्रवासी जनता आणि पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




माचाळला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू होती. मात्र, विविध कारणांमुळे अपेक्षित विकासाला गती मिळत नव्हती. आता एसटी महामंडळाने सुरू केलेल्या या बससेवेमुळे तालुक्याची शान असलेल्या या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांना सहज पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे माचाळच्या पर्यटन विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




माचाळ हे निसर्गसौंदर्याने नटलेले ठिकाण असून, येथे मुचकुंदी नदीचा उगम, मुचकुंदी ऋषींचा मठ, नैसर्गिक शुद्ध पाण्याचे स्रोत, वर्षभर जाणवणारे आल्हाददायक थंड वातावरण, स्वच्छ हवा आणि विविध वनौषधींची समृद्धी अनुभवायला मिळते. डोंगरमाथ्यावर वसलेल्या या गावात ढगांचे आगमन, धुक्याची चादर आणि निसर्गाचे मनमोहक रूप पर्यटकांना आकर्षित करते.




लांजा एसटी बस वाहतूक व्यवस्थापक राजेंद्र पाटोळे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे माचाळपर्यंत एसटी सेवा सुरू होत असल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या सुविधेमुळे माचाळची निसर्गसंपन्नता अधिकाधिक पर्यटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.




दरम्यान, माचाळला भेट देणाऱ्या पर्यटकांनी निसर्गाचे सौंदर्य जपण्याची जबाबदारीही पार पाडावी. प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या तसेच अन्य कचरा परिसरात टाकू नये. निसर्गरम्य परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाचे संरक्षण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT