जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वेंगुर्ल्यात भव्य नरकासूर स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वेंगुर्ल्यात भव्य नरकासूर स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ!
“

जय हनुमान मित्रमंडळाच्या आयोजनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; भाजपा युवा नेते विशाल परब यांचे प्रायोजन

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : कोकणच्या पारंपरिक उत्सवसंस्कृतीचा वारसा जपत जय हनुमान मित्रमंडळ, जुना स्टँड वेंगुर्ला यांच्या वतीने आयोजित आणि महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब पुरस्कृत भव्य नरकासूर स्पर्धेचा वेंगुर्ल्यात उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला. नरकासुराच्या भव्य प्रतिकृती, आकर्षक सजावट आणि तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे चैतन्य निर्माण झाले आहे.


नरकासूर स्पर्धेच्या निमित्ताने युवकांनी आपल्या कलात्मक कौशल्याचे दर्शन घडविले. विविध कल्पनांमधून साकारलेल्या नरकासुराच्या प्रतिकृती नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, स्पर्धेला स्थानिक नागरिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक उत्सवांचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच तरुणांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या आयोजनामागील उद्देश आहे.


या शुभारंभप्रसंगी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, वेंगुर्ल्याचे उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, नगरसेवक सचिन शेटये आदी मान्यवर उपस्थित होते.


या स्पर्धेमुळे युवकांना आपले कलागुण सादर करण्याची संधी मिळत असून, पारंपरिक नरकासूर उत्सवाची सांस्कृतिक परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे. जय हनुमान मित्रमंडळाच्या या उपक्रमातून वेंगुर्ल्यात उत्सवाचा उत्साह अधिक द्विगुणित झाला आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT