जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कुडाळ येथे सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कुडाळ येथे सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू
“

महिला व इतर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार

कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध असूनही मागील काही काळापासून आवश्यक मनुष्यबळाअभावी ही सेवा बंद होती. त्यामुळे महिला रुग्ण, गर्भवती महिला तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांना सोनोग्राफीसाठी बाहेरील ठिकाणी जावे लागत होते.

ही बाब लक्षात घेऊन रुग्ण कल्याण समितीवरील आमदार प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून सोनोग्राफी सेवेसाठी डॉ. राजेश उबाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आता जिल्हा महिला व बाल रुग्णालय, कुडाळ येथे दर बुधवार व शनिवार दुपारी २.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे परिसरातील महिला व इतर रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यासोबतच रुग्णालयामध्ये महिला रुग्णांसाठी स्त्रीरोग तपासणी व उपचार, प्रसूती, सिझेरियन, विविध आजारांची तपासणी व उपचार तसेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यांसारख्या आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत.

“रुग्णालयात मशीन उपलब्ध असताना केवळ सेवा बंद राहणे ही रुग्णांच्या दृष्टीने गंभीर बाब होती. ही समस्या दूर करून सोनोग्राफी सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी आमदार मा. श्री. निलेश राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात आला. आता डॉ. राजेश उबाळे यांच्या नियुक्तीमुळे ही सेवा पुन्हा नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झाली आहे,” असे आमदार प्रतिनिधी सौ. रश्मी देवेंद्र नाईक यांनी सांगितले.

कुडाळ-मालवण मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार मा. श्री. निलेश राणे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून यापुढेही सातत्याने प्रयत्न करण्यात येतील असे नाईक यांनी सांगितले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT