जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कुंभवडे शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे ४ नोव्हेंबरपर्यंत भरणार

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कुंभवडे शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे ४ नोव्हेंबरपर्यंत भरणार
“

उपसभापती गणेशप्रसाद गवस यांची दुर्गम शाळेला भेट; कंपाऊंड वॉल व रस्त्यांच्या विकासकामांनाही लवकरच गती देण्याचे आश्वासन

दोडामार्ग प्रतिनिधी✍️: दोडामार्ग तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभवडे येथे शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी भेट देत शाळेची पाहणी केली. यावेळी शाळेतील शैक्षणिक परिस्थिती, भौतिक सुविधा तसेच विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. ग्रामस्थांनी विशेषतः रिक्त असलेली शिक्षकांची पदे तातडीने भरण्याची मागणी केली.




या वेळी दादा देसाई, भगवान गवस, नारायण देसाई, विजय गावडे, मधुकर गावडे, सिताराम परब, बाळकृष्ण गावडे यांच्यासह माता-पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.




शिक्षक गोरे यांनी प्रास्ताविकातून शाळेची सद्यस्थिती, शैक्षणिक प्रगती आणि आवश्यक भौतिक सुविधांची माहिती दिली. शाळेतील शिक्षकांची दोन पदे रिक्त असल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे दोन्ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.




यासोबतच शाळेभोवती संरक्षण भिंत (कंपाऊंड वॉल) उभारावी, तळकट-कुंभवडे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करावे, तसेच वनहद्दीतील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी साफ करावी, अशा विविध मागण्याही ग्रामस्थांनी उपसभापती गवस यांच्यासमोर मांडल्या.




४ नोव्हेंबरपर्यंत शिक्षक नियुक्तीचे आश्वासन




ग्रामस्थांच्या मागण्यांची दखल घेत उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी कुंभवडे शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे येत्या ४ नोव्हेंबरपर्यंत भरण्यात येतील, असे आश्वासन दिले. तसेच शाळेची संरक्षण भिंत, तळकट-कुंभवडे रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, वनहद्दीतील झाडी साफसफाई यांसह इतर प्रलंबित कामेही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.




अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रश्नांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. आता दिलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, याकडे कुंभवडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT