जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

जयंत पाटील ४ व ५ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

जयंत पाटील ४ व ५ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर
“

पिंगुळी पाझर तलावाची करणार पाहणी; उपोषणकर्ते गंगाराम सडवेलकर यांची घेणार भेट

कुडाळ‌ प्रतिनिधी✍️ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा विधानमंडळ पक्षनेते आमदार जयंतराव पाटील हे बुधवार व गुरुवार, ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पिंगुळी येथील जिल्हा परिषद पाझर तलावाची पाहणी करणार असून, तलावाच्या संरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांचीही भेट घेणार आहेत. याशिवाय कुडाळ येथे पत्रकार परिषद घेणार आहेत.




बुधवार, ४ नोव्हेंबर रोजी जयंत पाटील मोटारीने ईश्वरपूर येथून आंबोलीच्या दिशेने रवाना होतील. सुमारे १६० किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आंबोली येथे त्यांचा मुक्काम राहणार आहे.




गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता ते आंबोलीहून पिंगुळीकडे प्रयाण करतील. सकाळी ८.३० वाजता पिंगुळी येथे पोहोचल्यानंतर जिल्हा परिषद पाझर तलावाची पाहणी करतील. त्यानंतर सकाळी १० वाजता कुडाळ प्रांत कार्यालयाकडे रवाना होतील. तेथे पाझर तलावाच्या प्रश्नासाठी उपोषणाला बसलेले जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांची भेट घेणार आहेत.




कुडाळ येथे सकाळी ११.३० वाजता जयंत पाटील यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. पत्रकार परिषदेनंतर भोजन करून ते सावंतवाडी तालुक्यातील सासोलीच्या दिशेने रवाना होतील. दुपारी २ वाजता सासोली येथे पोहोचल्यानंतर तेथील साईटची पाहणी करणार आहेत.




सासोली दौरा आटोपल्यानंतर दुपारी ३.३० वाजता ते मोटारीने गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मोपा येथे रवाना होतील. सायंकाळी ५.२० वाजता एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील. सायंकाळी ६.४० वाजता मुंबई विमानतळावर पोहोचल्यानंतर पुढील प्रवास करून मुक्काम करतील.




जयंत पाटील यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात पिंगुळी येथील पाझर तलावाचा प्रश्न तसेच सासोली येथील साईटची पाहणी हे प्रमुख विषय राहणार असून, या दौऱ्याकडे स्थानिक पातळीवर लक्ष लागले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT