जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

ग्रामीण विकासासाठी शासन कटिबद्ध; सावंतवाडी पंचायत समितीला १४.६५ कोटींची नवी इमारत!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

ग्रामीण विकासासाठी शासन कटिबद्ध; सावंतवाडी पंचायत समितीला १४.६५ कोटींची नवी इमारत!
“

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नूतन इमारतीचे दिमाखात भूमिपूजन; २३ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे निर्देश

सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, ग्रामीण विकासाची यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांना गती देण्यासाठी शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जात आहे. याच अनुषंगाने सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी १४.६५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या इमारतीचे बांधकाम उर्वरित २३ महिन्यांत कोणतीही तक्रार निर्माण होणार नाही, अशा दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. तसेच भविष्यातही विकासकामांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.




सावंतवाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा शनिवारी पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची प्रमुख उपस्थिती होती.




या कार्यक्रमाला जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, प्रांताधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार श्रीधर पाटील, गटविकास अधिकारी निलेश जाधव, जिल्हा परिषद सदस्य सुदन कवठणकर, सचिन वालावलकर, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर, सदानंद राणे, मायकल डिसोजा, उदय पारिपत्ये, प्रथमेश सावंत यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते.




यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री नितेश राणे यांनी या इमारतीच्या उभारणीसाठी अनेकांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. तत्कालीन मंत्री भाईसाहेब सावंत यांच्यापासून माजी पालकमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर तसेच पंचायत समितीच्या तत्कालीन सभापती, उपसभापती आणि पदाधिकाऱ्यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे त्यांनी सांगितले.




इमारतीच्या आराखड्यात फर्निचरचा समावेश करण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव सादर केल्यास त्यालाही तातडीने मंजुरी दिली जाईल. त्यामुळे कामादरम्यान निधीअभावी कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. एकूण २४ महिन्यांच्या कालावधीपैकी एक महिना पूर्ण झाला असून, उर्वरित २३ महिन्यांत ही इमारत दिमाखात उभी राहावी. तिच्या उद्घाटन सोहळ्यास खासदार नारायण राणे यांना निमंत्रित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.




सिंधुदुर्ग जिल्ह्यावर सध्या दुष्काळाचे सावट असून, प्रशासन 'ट्रिगर वन' अंतर्गत काम करत आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासकीय योजना आणि मदत पोहोचवणारी पंचायत समितीची यंत्रणा अधिक सक्षम असणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.




सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून या गुंतवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठाही केला जात आहे. त्यामुळे या भागात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल. स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही पालकमंत्री राणे यांनी दिले.




आराखड्यात वारंवार बदल न करता काम वेळेत पूर्ण करा : आमदार दीपक केसरकर




आमदार दीपक केसरकर यांनी आपल्या भाषणात मंजूर आराखड्यानुसारच काम पूर्ण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. एखादा आराखडा मंजूर झाल्यानंतर त्यात वारंवार बदल केल्यास वाढीव निधीच्या मंजुरीसाठी वेळ जातो आणि त्यामुळे काम रखडण्याची शक्यता असते. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समितीच्या इमारतीचे काम मंजूर आराखड्यानुसारच पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.




सध्या पंचायत समितीचे काम सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असून, विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातच नूतन इमारतीचे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जिल्ह्यातील इतर प्रलंबित इमारतींची कामेही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येतील. खासदार नारायण राणे यांचे या मतदारसंघावर नेहमीच विशेष प्रेम राहिले आहे. पालकमंत्री नितेश राणे हेही विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका घेत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.




जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पंचायत समितीच्या नूतन इमारतीसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, पालकमंत्री आणि स्थानिक आमदारांचे आभार मानले. या नव्या वास्तूमधून ग्रामीण विकासाला अधिक गती मिळेल आणि विकासाची गंगा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.




मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर यांनी पंचायत समिती ही प्रशासन आणि विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांमधील महत्त्वाचा दुवा असल्याचे सांगितले. पंचायत समितीची यंत्रणा सक्षम झाल्यास ग्रामीण भागातील विकासकामे अधिक प्रभावीपणे राबविता येतील, असे त्यांनी नमूद केले.




कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी केले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात
सामाजिक

लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!
आंतरराष्ट्रीय

सागरी संपत्तीचे संवर्धन आणि मच्छीमारांचे हक्क जपण्याचा संकल्प; आज जागतिक मच्छीमार दिन!

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती
प्रशासन

कणकवली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी निवारा शेडची सुविधा; पालकमंत्री नितेश राणेंची विशेष उपस्थिती

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!
शैक्षणिक

विनोद मेतर यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६’ जाहीर!

ANCHOR AD SLOT