जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

एकतेच्या संदेशासाठी कुडाळकरांची धाव; ‘रन फॉर युनिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

एकतेच्या संदेशासाठी कुडाळकरांची धाव; ‘रन फॉर युनिटी’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
“

सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे पाच किलोमीटर एकता दौड; पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी दिली राष्ट्रीय एकात्मतेची शपथ

कुडाळ प्रतिनिधी✍️: राष्ट्रीय एकता दिन तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त कुडाळ येथे सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रन फॉर युनिटी’ या पाच किलोमीटरच्या एकता दौडीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘एकतेसाठी धावूया, एकतेसाठी चालूया’ या संदेशातून राष्ट्रीय एकात्मतेचा जागर करण्यात आला. पोलीस अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था-संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.




कुडाळ पोलीस ठाणे आणि सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने या दौडीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच कुडाळ पोलीस ठाण्याच्या मैदानावर सहभागींची गर्दी होऊ लागली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नायोमी साटम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. नावनोंदणी व वॉर्मअपनंतर पोलीस बँडच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.




जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अपर पोलीस अधीक्षक नायोमी साटम आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत यांनी झेंडा दाखवून एकता दौडीला प्रारंभ केला. यावेळी सहभागींच्या ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.




दौडीचा मार्ग कुडाळ पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस चौक, एसटी बसस्थानक, काळप नाका, राज नाका, एस. एन. देसाई चौक आणि पुन्हा कुडाळ पोलीस ठाणे असा निश्चित करण्यात आला होता. धावपटूंसाठी मार्गावर पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रिफ्रेशमेंट पॉइंटची व्यवस्था करण्यात आली होती.




या उपक्रमात कुडाळसह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी, पोलीस पाटील, महिला मंडळांच्या सदस्यांसह लायन्स क्लब, कुडाळ मॅरेथॉन टीम, सायकल क्लब, क्रिकेट क्लबचे सदस्य आणि नागरिक सहभागी झाले. त्यामुळे संपूर्ण दौडीदरम्यान उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.




दौड पूर्ण झाल्यानंतर कुडाळ पोलीस ठाण्याच्या मैदानावर समारोपाचा कार्यक्रम झाला. दौडीतील प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नायोमी साटम यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यानंतर डॉ. दहिकर यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. सहभागी मान्यवर व नागरिकांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानण्यात आले. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




यावेळी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, पोलीस निरीक्षक विकास बडवे, कुडाळ मॅरेथॉनचे डॉ. जी. टी. राणे, सायकल क्लबचे गजानन कांदळगावकर, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कोरगावकर, लायन्स क्लबच्या अध्यक्षा स्नेहा नाईक, सचिव शोभा माने यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT