जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

डिजिटल सेवांच्या विस्तारातून शासकीय कामकाज अधिक पारदर्शक होणार

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

डिजिटल सेवांच्या विस्तारातून शासकीय कामकाज अधिक पारदर्शक होणार
“

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाडीबीटी २.०, आपले सरकार २.० आणि महाइंडसचा शुभारंभ

मुंबई प्रतिनिधी✍️: कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरामुळे शासकीय कामकाज अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि उत्तरदायी होण्यास मदत होईल. योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी तसेच योजनांच्या परिणामकारकतेचे मूल्यमापन अधिक प्रभावीपणे करता येणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


सह्याद्री अतिथिगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते महाडीबीटी २.०, आपले सरकार २.०, मैत्री पोर्टलवरील नवीन सेवा तसेच ‘महाइंडस’ या सुरक्षित एआय प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी महासारथी पोर्टलच्या कामकाजाचाही आढावा घेतला.


‘महाइंडस’च्या माध्यमातून मराठीसह २२ भारतीय भाषांमध्ये मसुदालेखन, भाषांतर, सारांश तयार करणे तसेच माहितीचे विश्लेषण करता येणार आहे. या प्लॅटफॉर्मवरील शासकीय माहिती देशाबाहेर जाणार नाही, तसेच ती एआय मॉडेलच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाणार नाही, अशी सुरक्षित व्यवस्था करण्यात आली आहे.


‘महासारथी’ आणि ‘महाआयडी’च्या माध्यमातून विविध विभागांमधील माहितीचे एकत्रीकरण, शासकीय निर्णयांचा शोध, पत्रव्यवहाराचे व्यवस्थापन आणि लाभार्थ्यांची पडताळणी अधिक सुलभ होणार आहे. ‘महाआयडी’अंतर्गत आतापर्यंत एक कोटीहून अधिक आयडी तयार झाले आहेत. डिजिटल प्रणालींचा प्रत्यक्ष वापर वाढवून त्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि सर्व विभागांनी निर्धारित वेळेत काम पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.


दरम्यान, ‘महाडीबीटी २.०’वर मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४, कामगार विभागाच्या १० आणि महिला व बालविकास विभागाच्या दोन अशा एकूण ३६ नवीन योजनांचा शुभारंभ करण्यात आला. तसेच ‘आपले सरकार २.०’वर परिवहन विभागाच्या ६१ सेवांसह विविध विभागांच्या एकूण ७१ सेवा, तर ‘मैत्री’ पोर्टलवर वैधमापनशास्त्र विभागाच्या १३ नवीन सेवा सुरू करण्यात आल्या.


या बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनू कुमार श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सचिव उपस्थित होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन

सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

ANCHOR AD SLOT