जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

चारा लागवडीसाठी आर्थिक मापदंडास शासनाची मंजुरी

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

चारा लागवडीसाठी आर्थिक मापदंडास शासनाची मंजुरी
“

वैयक्तिक व सार्वजनिक जमिनीवर चारा पिकांची लागवड होणार; पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होण्यास मदत

मुंबई प्रतिनिधी✍️: ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण)’ (व्हीबी जी राम जी) अंतर्गत वैयक्तिक तसेच ग्रामपंचायत आणि सार्वजनिक जमिनीवर चारा पिकांची लागवड करण्यासाठीच्या सविस्तर अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दुष्काळसदृश तालुक्यांसह ग्रामीण भागातील पशुपालकांना हिरवा चारा उपलब्ध होण्यास मदत होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिली.




वैयक्तिक जमिनीवर ७ हजार ४९० रोपांच्या चारा लागवडीसाठी १ लाख २१ हजार ८१५ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये २४५ मनुष्य-दिवसांच्या मजुरीसाठी ७७ हजार ६६५ रुपये, तर साहित्य खर्चासाठी ४४ हजार १५० रुपयांची तरतूद आहे.




ग्रामपंचायत हद्द, गावठाण तसेच विहिरीजवळील उपलब्ध जागेवर एक एकर क्षेत्रात चारा लागवडीसाठी १ लाख ५५ हजार ३ रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये २९५ मनुष्य-दिवसांच्या मजुरीसाठी ९३ हजार ५१५ रुपये आणि साहित्य खर्चासाठी ६१ हजार ४८८ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही प्रकारच्या कामांसाठी प्रतिदिन ३१७ रुपये मजुरी दर गृहीत धरण्यात आला आहे.




या कामांमध्ये जमीन स्वच्छ करणे, पूर्वमशागत, खत देणे, पेरणी किंवा लागवड, गरजेनुसार पाणी देणे, आंतरमशागत, निंदणी, कापणी तसेच माहिती फलक लावणे आदी कामांचा समावेश आहे. त्यामुळे उपलब्ध जमिनीचा योग्य वापर होऊन चारा उत्पादन वाढण्यास आणि पशुधनासाठी सातत्याने हिरवा चारा उपलब्ध होण्यास मदत होईल, असे मंत्री गोगावले यांनी सांगितले.




चारा लागवडीसाठी तयार करण्यात आलेल्या या आराखड्यामुळे दुष्काळ निवारण, हिरव्या चाऱ्याची उपलब्धता आणि ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती अशी तीन उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होणार आहे. संबंधित सर्व यंत्रणांनी या योजनेची प्रभावीपणे आणि युद्धपातळीवर अंमलबजावणी करावी, असे आवाहन मंत्री गोगावले यांनी केले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT