जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वेंगुर्ल्यात राष्ट्रीय एकता आणि सायबर सुरक्षिततेचा संदेश देत मॅरेथॉन दौड

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वेंगुर्ल्यात राष्ट्रीय एकता आणि सायबर सुरक्षिततेचा संदेश देत मॅरेथॉन दौड
“

पोलीस, होमगार्ड, पोलीसपाटील व नागरिकांचा सहभाग; दोन्ही स्पर्धांतील विजेत्यांचा पदक देऊन गौरव

वेंगुर्ला स्वरूपा सौदागर ✍️ : राष्ट्रीय एकतेचे महत्त्व पटवून देण्यासह नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी राष्ट्रीय एकता मॅरेथॉन दौडीचे आयोजन करण्यात आले. ‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.




वेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प परिसरात सकाळी ७.३० वाजता पाच किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन पार पडली. राष्ट्रीय एकतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि डिजिटल माध्यमांचा वापर करताना सायबर सुरक्षिततेचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या दौडमध्ये सुमारे १०० पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पोलीसपाटील आणि नागरिक सहभागी झाले होते.




‘डिजिटल एकता, सुरक्षित भविष्य’ या दौड स्पर्धेत शंकर परब यांनी प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. तेजस देसाई यांनी द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक, तर वैभव चौकेकर यांनी तृतीय क्रमांक मिळवत कांस्यपदक पटकाविले.




राष्ट्रीय एकता दौड स्पर्धेत गौरांग नाईक यांनी प्रथम क्रमांक, पूजा पवार यांनी द्वितीय क्रमांक, तर रेश्मा वरक यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या तिन्ही विजेत्यांना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक देऊन गौरविण्यात आले.




वेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते सर्व विजेत्यांना पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय एकात्मता आणि सायबर सुरक्षिततेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT