जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे मातीखालून सापडलेली सरड्याची अंडी कृत्रिमरित्या उबवून त्यातून १० पिलांना जन्म

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे मातीखालून सापडलेली सरड्याची अंडी कृत्रिमरित्या उबवून त्यातून १० पिलांना जन्म
“

सर्पमित्र महेश श्रीधर राऊळ यांना यश आले आहे. निसर्ग संवर्धनाच्या दिशेने त्यांची ही चौथी यशस्वी कामगिरी

वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथे मातीखालून सापडलेली सरड्याची अंडी कृत्रिमरित्या उबवून त्यातून १० पिलांना जन्म देण्यात सर्पमित्र महेश श्रीधर राऊळ यांना यश आले आहे. निसर्ग संवर्धनाच्या दिशेने त्यांची ही चौथी यशस्वी कामगिरी आहे.

तुळस येथील राजू परुळकर यांच्या घराच्या कामासाठी ठेवलेल्या वाळू मधून बाहेर आलेली सुमारे १४ अंडी आढळून आली होती.उन्ह,मुंग्या आणि इतर नैसर्गिक अडथळ्यांमुळे ती नष्ट होण्याची शक्यता होती. परूळकर यांनी महेश राऊळ यांना फोन करून याची माहिती दिल्यावर सर्पमित्र महेश राऊळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व अंडी अत्यंत काळजीपूर्वक सुरक्षित स्थळी हलवली.

त्यांनी घरातच ओलसर माती व नारळाच्या भुशाचा वापर करून निसर्गसदृश उबवण केंद्र तयार केले.सुमारे २० दिवस अचूक तापमान व आर्द्रतेची काळजी घेतल्यानंतर या अंड्यांमधून १० निरोगी पिलांचा जन्म झाला.सर्व पिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडण्यात आले.

उल्लेखनीय आहे की,यापूर्वीही महेश राऊळ यांनी तेल सरडा आणि गार्डन लिझार्ड अशा दोन प्रकारच्या सरड्यांची अंडी तीन वेळा यशस्वीरित्या उबवून सरड्यांच्या पिलांना जीवदान दिले आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्यामुळे वन्यजीव संवर्धनाचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.

"सापांप्रमाणेच सरडे देखील शेतकऱ्यांचे मित्र आहेत.ते कीटकांवर नियंत्रण ठेवतात. प्रत्येक अंड्यामागे एक जीव असतो,तो वाचवणे हे आपले कर्तव्य आहे," या सृष्टीतील प्रत्येक सजीवांना जगण्याचा अधिकार आहे.जगवा आणि जगा याचं माणसाने तंतोतंत पालन केले पाहिजे.जिवश्रुष्टि टिकली तरच आपण टिकणार आहोत असे महेश राऊळ यांनी सांगितले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT