जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

वेंगुर्ला तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल रखडले संजय गावडे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

वेंगुर्ला तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल रखडले संजय गावडे
“

प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने लाभार्थी संकटात

वेंगुर्ला तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल रखडले; प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने लाभार्थी संकटात यादी मंजूरीसाठी पाठवली पण मंजुरीच नाही, मार्चनंतर पाणीटंचाईने घरांची कामे बंद पडण्याची भीती; योजना तातडीने सुरू करावी -जि. प. सदस्य श्री संजय गावडे यांनी मागणी केली आहे. तालुक्यातील वेंगुर्ला पंचायत समिती अंतर्गत यावर्षी प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी मंजूरीसाठी (तांत्रिक मान्यतेसाठी) पाठवण्यात आली आहे. मात्र, अद्यापपर्यंत या यादीला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेले गरीब लाभार्थी हवालदिल झाले आहेत.

यावर्षी भीषण पाणीटंचाईची शक्यता असून, जर मार्च महिन्यापूर्वी घरकुलांची कामे सुरू झाली नाहीत तर पाण्याअभावी बांधकामे रखडणार आहेत. पाण्यासाठी वणवण करावी लागणार असून, मजूर मिळणार नाहीत आणि सिमेंट-काँक्रीटची कामे होणार नाहीत.पावसात छत नसल्यानेउघड्यावर राहण्याची वेळ जर ही घरे पावसापूर्वी पूर्ण झाली नाहीत, तर लाभार्थ्यांना पुढील पावसाळ्यातही पत्र्याच्या किंवा कुडाच्या घरात, छत नसलेल्या अवस्थेत उघड्यावर राहावे लागेल. त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये "यावर्षीही घरे मिळतील की नाही?" अशी शंका निर्माण झाली आहे.याबाबत जिल्हा परिषद सदस्य व वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे यांनी प्रशासनाकडे तातडीने मागणी केली आहे.गावडे म्हणाले, _"शासनाने या योजनेला लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता द्यावी, ग्रामपंचायतीने जॉबकार्ड, जिओ टॅगिंग तातडीने पूर्ण करावे आणि लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता तात्काळ जमा करावा. पाणीटंचाई सुरू होण्यापूर्वी आणि पावसापूर्वी घरांचे प्लिंथ लेव्हलपर्यंतचे काम पूर्ण होणे गरजेचे आहे. नाहीतर ही घरे अपूर्णच राहतील."_

वेळेत निधी न मिळाल्यास घरकुल लाभार्थ्यांना घेऊन पंचायत समिती कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशाराही गावडे यांनी दिला आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT