जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात भाजयुमोच्या वतीने बॉडी बिल्डिंग व नरकासुर स्पर्धा

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सावंतवाडी विधानसभा क्षेत्रात भाजयुमोच्या वतीने बॉडी बिल्डिंग व नरकासुर स्पर्धा
“

१ नोव्हेंबरला बॉडी बिल्डिंग स्पर्धा; ७ नोव्हेंबरला भव्य नरकासुर स्पर्धेचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधी✍️: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, सावंतवाडी विधानसभा क्षेत्राच्या वतीने दीपावलीनिमित्त युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडाभावना तसेच पारंपरिक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा आणि नरकासुर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.




भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बॉडी बिल्डिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभर राबविण्यात येणाऱ्या ‘रन फॉर युनिटी’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून एकता, आरोग्य आणि राष्ट्रभावनेचा संदेश दिला जात आहे. याच प्रेरणेतून युवा मोर्चाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.




१ नोव्हेंबरला बॉडी बिल्डिंग स्पर्धा




भव्य बॉडी बिल्डिंग स्पर्धा रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता सावंतवाडी येथील जगन्नाथ उद्यान, मोती तलाव येथे होणार आहे.




या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणून गोव्याशी संबंधित तसेच दुबई येथेही आपल्या कामगिरीची छाप पाडलेले आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर निवेद शेटकर उपस्थित राहणार आहेत.




स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवकांचे आधारस्तंभ विनोददादा राऊळ तसेच सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निलवडेकर उपस्थित राहणार आहेत.




दीपावलीच्या पार्श्वभूमीवर युवकांना शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा क्षेत्राकडे प्रोत्साहित करण्यासोबतच पारंपरिक उत्सवाची जोड देणाऱ्या या उपक्रमाला युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ल्यात भव्य नरकासूर स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ!
सामाजिक

वेंगुर्ल्यात भव्य नरकासूर स्पर्धेचा जल्लोषात प्रारंभ!

युवा पिढीने सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय व्हावे :  प्राजक्ता बांदेकर शिरवलकर
सामाजिक

युवा पिढीने सामाजिक आणि सार्वजनिक कार्यात सक्रिय व्हावे : प्राजक्ता बांदेकर शिरवलकर

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान
गुन्हेगारी

मळगाव-सावंतवाडी मार्गावर गव्याची वाहनाला धडक; वाहनाचे नुकसान

ANCHOR AD SLOT