जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील महिला अतिदक्षता कक्षाचा सेंट्रल एसी सुरू

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील महिला अतिदक्षता कक्षाचा सेंट्रल एसी सुरू
“

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान आणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता

सावंतवाडी प्रतिनिधी ✍️: येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला अतिदक्षता कक्षाचा सेंट्रल एसी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने उष्णतेमुळे महिला रुग्णांना त्रास सहन करावा लागत होता.या गांभीर बाबीकडे जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान आणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बुधवारी सकाळी पुण्याहून तंत्रज्ञ पाठविण्यात आले.त्यानंतर बंद पडलेला सेंट्रल एसी पूर्ववत सुरू करण्यात आला असून महिला रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महिला अतिदक्षता कक्षातील एसी बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती.

यासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक तथा हृदयरोगतज्ज्ञ डॉ.विशाल पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन श्रीपाद पाटील यांना लेखी पत्र पाठवून पाठपुरावा केला होता.तसेच जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुबोध इंगळे आणि अनिलकुमार देसाई यांच्याशीही यासंदर्भात संपर्क साधण्यात आला होता.

एसी बंद असल्याने रुग्णांना तात्पुरता दिलासा मिळावा, यासाठी राजू मसुरकर यांच्या पुढाकारातून दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने रुग्णालयाला दहा स्टँड फॅन उपलब्ध करून देण्यात आले होते.यामध्ये निवृत्त स्टेट बँक अधिकारी प्रफुल्ल सांगोडकर,हॉटेल व्यावसायिक राजू भालेकर आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी पोकळे यांनी सहकार्य केले.अशी माहिती राजू मसुरकर यांनी दिली.

दरम्यान संबंधित कंपनीची सुमारे १० लाख ५० हजार रुपयांची देय रक्कम प्रलंबित असल्याने कंपनीकडून देखभाल-दुरुस्तीच्या कामात अडचणी येत होत्या.ही रक्कम कंपनीला लवकर मिळावी, यासाठीही राजू मसुरकर प्रयत्नशील आहेत.आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली असून, संबंधित कंपनीला लवकरच देय रक्कम मिळण्याचे आश्वासन देण्यात आल्याची माहिती राजू मसुरकर यांनी दिली.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT