कणकवली प्रतिनिधी✍️: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत ‘सेवा की कहानी’ हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमात लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया (बाईट) घेऊन त्या माध्यमातून अभियानाची माहिती पोहोचविण्याच्या कामात कणकवली मंडलाने महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
कणकवली मंडलाचे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत प्रदेश संघटन महामंत्री सतीशजी धोंड यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही या अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल जिल्ह्यातील यशस्वी कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध अभियानांची माहिती दिली. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या अभियानाचे सहसंयोजक तसेच भाजप सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांचेही विशेष अभिनंदन करण्यात आले.
जिल्हाभरात ‘सेवा की कहानी’ अभियान प्रभावीपणे राबविल्याबद्दल कार्यक्रमाचे संयोजक श्रीकृष्ण परब आणि कणकवली मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचेही उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, निसार शेख, मंडल उपाध्यक्ष संदीप सावंत, सरपंच सचिन पारधिये, सरपंच अजित पवार, सरपंच सुशील कदम, पपू पुजारे, सुधीर सावंत, बाबजी चव्हाण, भगवान दळवी, विजय चिंदरकर, सदा चव्हाण, अमोल रासम, कीर्ती कुमार राणे, सुभाष मालंडकर, प्रशांत राणे, नितीन राणे, विश्वरूप लाड, किशोर राणे आदी उपस्थित होते.