जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

सांगवे येथे गांडूळखत निर्मिती व खेकडापालन प्रकल्पाचे उद्घाटन

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

सांगवे येथे गांडूळखत निर्मिती व खेकडापालन प्रकल्पाचे उद्घाटन
“

जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते शुभारंभ; महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन

कणकवली प्रतिनिधी✍️: महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत (उमेद) कणकवली तालुक्यातील सांगवे येथे उमेद व सावित्री महिला स्वयं-सहाय्यता गटाच्या पुढाकारातून सुरू करण्यात आलेल्या गांडूळखत निर्मिती आणि खेकडापालन प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते पार पडला.




ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासह त्यांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महिला बचत गटांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत आहे. या अनुषंगाने गांडूळखत निर्मिती व खेकडापालन यांसारखे पूरक व्यवसाय महिलांसाठी उत्पन्नाचे साधन ठरू शकतात. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.




या कार्यक्रमाला उमेद अभियानाच्या कणकवली पंचायत समितीच्या तालुका अभियान व्यवस्थापक दक्षता पांजरी, प्रभाग समन्वयक समृद्धी गावडे, तालुका व्यवस्थापक प्रीतम ताम्हणकर, ब्लॉक कर्मचारी मयूर धुमाळ, सांगवे गावचे सरपंच संजय सावंत, उपसरपंच प्रफुल नार्वेकर, संजय कदम, सागर चव्हाण यांच्यासह महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




महिला बचत गटांनी पारंपरिक व्यवसायांबरोबरच गांडूळखत निर्मिती आणि खेकडापालन यांसारखे पूरक व्यवसाय आत्मसात केल्यास महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासोबतच गावाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT