जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

मळेवाड कोंडुरे येथील सर्व बंधारे दुरुस्ती कामाला मंजुरी,जि प सदस्य व प स सदस्यांच्या पाठपुराव्याला यश

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

मळेवाड कोंडुरे येथील सर्व बंधारे दुरुस्ती कामाला मंजुरी,जि प सदस्य व प स सदस्यांच्या पाठपुराव्याला यश
“

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केल्या बद्दल आभार

सावंतवाडी प्रतिनिधी✍️तालुक्यातील ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रातील असलेल्या ६ बंधाऱ्यांच्या दुरुस्ती कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यक्षेत्रात ६ काँक्रिट बंधारे असून मोठ्या प्रमाणात हे बंधाऱ्यांच्या माध्यमातून नदीचे पाणी अडवले जाते. यामुळे मळेवाड गावातील अनेक विहिरी व शेतजमिनी ओलिताखाली येतात.बरीच वर्षे झाल्याने या बंधाऱ्यांची दुरुस्ती होणे गरजेचे होते.काही बंधारे नादुरुस्त झाल्याने त्यात पाणी अडवणे बंद होते. मात्र आता कमी पाऊस पडल्याने ठीक ठिकाणी पाणी अडवून ते जमिनीत मुरावे असा उपक्रम शासनाने हाती घेतला असून याच अनुषंगाने अशा बंद अवस्थेतील व दुरुस्ती करणे गरजेचे आहे अशा बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे मळेवाड कोंडुरे गावातील कोंडुरे कदमवाडी,मळेवाड राणेवाडी,मळेवाड नाईकवाडी, मळेवाड भटवाडी, मळेवाड चव्हाणवाडी मळेवाड म्हापसेकरवाडी या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल.यामध्ये बंधाऱ्यांच्या प्लेट,गाळ काढणे,प्लेट गाळे दुरुस्त करणे,संरक्षण भिंत बांधणे अशी कामे समाविष्ट आहेत.या सर्व कामांचा जिल्हा परिषद सदस्य अपर्णा सातोसकर व पंचायत समिती सदस्य धनश्री मराठे यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून सदरची कामे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंजूर केल्या बद्दल पालकमंत्री राणे यांचे आभार मानण्यात येत आहेत.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT