जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

कुडाळ शहरात उद्या मंदार शिरसाठ यांच्या पुढाकारातून वनराई बंधारे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

कुडाळ शहरात उद्या मंदार शिरसाठ यांच्या पुढाकारातून वनराई बंधारे
“

संपूर्ण शहरात जलसंवर्धनाची मोहीम

कुडाळ प्रतिनिधी✍️ : कुडाळ शहरातील भूगर्भातील पाणीपातळी वाढवून संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या पुढाकारातून कुडाळ शहरात विविध ठिकाणी वनराई बंधारे उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ बुधवार, २१ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत स्थानिक नागरिकांच्या श्रमदानातून बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामुळे पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवण्यास मदत होणार असून, परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत वाढ होण्यास हातभार लागणार आहे. बुधवारी सकाळी ओमकार नगर येथे श्री. शिंदे यांच्या घराशेजारी पहिल्या बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात होईल. यावेळी ओमकार नगरमधील नागरिक श्रमदानात सहभागी होणार आहेत. त्यानंतर विठ्ठलवाडी रो-हाऊसशेजारी बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात येईल. या ठिकाणीही परिसरातील नागरिकांचा सहभाग लाभणार आहे.पहिल्या टप्प्यातील कामांनंतर कुडाळ शहरातील अन्य भागांतही स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने वनराई बंधारे उभारण्यात येणार आहेत. लोकसहभागातून शहराला जलसमृद्ध करण्याचा या उपक्रमामागील उद्देश आहे.

कुडाळ शहरातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आणि पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाठ व संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT