जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलची दमदार कामगिरी

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलची दमदार कामगिरी
“

पाच गटांत विजेतेपद; कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी संघांची निवड

कुडाळ प्रतिनिधी✍️: जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पाच गटांत विजेतेपद पटकावले. ६ व ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या तीन, तर मुलांच्या दोन गटांनी प्रथम क्रमांक मिळवत प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील वर्चस्वाची परंपरा कायम राखली. या सर्व विजयी संघांची आता कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.




६ ऑक्टोबर रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर मुलींच्या विविध वयोगटांतील व्हॉलीबॉल सामने पार पडले. पाट हायस्कूलने १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलींचे संघ या स्पर्धेत उतरवले होते. तिन्ही संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद मिळविले.




यानंतर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुलांच्या स्पर्धेतही पाट हायस्कूलच्या खेळाडूंनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली. १४ आणि १९ वर्षांखालील दोन्ही मुलांच्या संघांनी प्रथम क्रमांक मिळवत प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. अशा प्रकारे जिल्हास्तरावर पाच गटांत विजेतेपद मिळवण्याचा बहुमान पाट हायस्कूलने पटकावला.




विजेत्या संघातील खेळाडू




१४ वर्षांखालील मुली : कर्णधार खुशी कोचरेकर, अदिती घाडी, साक्षी प्रभू, शांती मुंड्ये, वेदश्री दाभोलकर, मयुरी केरकर, धार्मि गोसावी, कृतिका राऊळ, आरोही पाटकर आणि आराध्या पाटकर.




१४ वर्षांखालील मुले : कर्णधार वेदांत शृंगारे, कुणाल रावले, सहज बुरुड, विघ्नेश सावंत, रेहान नार्वेकर, राजदत्त राऊळ, रघुनाथ सारंग, भार्गव पेडणेकर, ध्रुव भगत, चैतन्य खोत, चिन्मय पाटकर आणि सोहम कोचरेकर.




१७ वर्षांखालील मुली : कर्णधार गायत्री चीपकर, श्रेया सागवेकर, सार्थकी फणसेकर, आर्या ठाकूर, आर्या प्रभू, कोमल कुडव, चिन्मय सकरे, तन्वी दाभोलकर, दीपश्री खोत, धनदा सावंत, निधी चव्हाण आणि हर्षी मोर्ये.




पाट हायस्कूलच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत असून, आगामी कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू
गुन्हेगारी

दोडामार्ग-तिलारी मार्गावर भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश
सामाजिक

महिला उद्योजिकांचा गौरव; स्वावलंबनाचा संदेश

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!
सांस्कृतिक

दाभोसवाड्यात शौर्य प्रतिष्ठानचा भव्य उपक्रम; १८ फुटी गणेशमूर्तीचे अनावरण!

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन

वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी

ANCHOR AD SLOT