सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ :जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. यावेळी दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि शासनाकडून आवश्यक असलेल्या अतिरिक्त मदतीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, अधिकारी चव्हाण आणि अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांच्याशी सिंचन प्रकल्पांची सद्यस्थिती, धरणातील पाण्याचा योग्य वापर आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक नियोजन याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. यासोबतच जिल्हा परिषद शाळा टिकवून त्यांचे आधुनिकीकरण करणे आणि विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत आधुनिक तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.
आमदार प्रमोद जठार यांनी दुष्काळ परिस्थिती व शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला
व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा
फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
“
उपाययोजना आणि शासनाकडून आवश्यक असलेल्या अतिरिक्त मदतीबाबत चर्चा
दादा सारंग
लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.
संबंधित बातम्या
एक टिप्पणी द्या
संबंधित बातम्या
प्रशासन
सिंधुदुर्गातील मोफत डायलेसिस सेवा सुरूच राहणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश
प्रशासन
वर्सोवा कोळीवाड्यात मच्छीमार बांधवांसोबत मंत्री नितेश राणे यांची दिवाळी
प्रशासन
४९ वर्षांची रुग्णसेवा, २५ वर्षे विनामूल्य तपासणी; डॉ. शीतल शहा यांचे कार्य प्रेरणादायी!
प्रशासन
दिवाळीच्या प्रकाशात जपूया पाण्याचा प्रत्येक थेंब!