जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

दीड वर्षांची असताना बेवारस अवस्थेत सापडली; आज नागपूर महापालिकेत टॅक्स कलेक्टर

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

दीड वर्षांची असताना बेवारस अवस्थेत सापडली; आज नागपूर महापालिकेत टॅक्स कलेक्टर
“

आनंदवनातील संस्कार, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मंगला भिवंडीकर यांची यशाला गवसणी; संघर्षमय प्रवासातून अनेकांसमोर उभा केला आदर्श

नागपूर‌ प्रतिनिधी✍️ : आयुष्यात यश मिळवण्यासाठी परिस्थिती अनुकूल असावीच लागते असे नाही, तर मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीवरही मात करता येते, याचा प्रत्यय मंगला भिवंडीकर यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासातून येतो. अवघ्या दीड वर्षांच्या असताना बेवारस अवस्थेत सापडलेल्या मंगला यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आज नागपूर महानगरपालिकेत 'टॅक्स कलेक्टर' (कर संकलक) म्हणून शासकीय सेवेत स्थान मिळवले आहे.




मंगला यांचा प्रवास संघर्षाने भरलेला आहे. दीड वर्षांच्या असताना त्या भिवंडी येथे बेवारस अवस्थेत आढळल्या. त्यानंतर त्यांना मुंबईतील माटुंगा येथील 'श्रद्धानंद महिला आश्रमा'त दाखल करण्यात आले. पुढे त्यांचा सांभाळ बाबा आमटे यांच्या 'आनंदवन' संस्थेत करण्यात आला. आनंदवनातील प्रेमळ वातावरण, आपुलकी आणि मिळालेल्या संस्कारांनी त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली. याच संस्थेच्या आधारावर त्यांनी आपले शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.




शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शासकीय सेवेत रुजू होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनच्या 'मनोबल' निवासी प्रकल्पात प्रवेश घेतला. येथे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करत त्यांनी अभ्यासात स्वतःला झोकून दिले. कठोर परिश्रम, सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर त्यांनी महापालिकेची परीक्षा उत्तीर्ण केली.




अखेर त्यांच्या मेहनतीला यश आले असून, मंगला भिवंडीकर यांची नागपूर महानगरपालिकेत टॅक्स कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली आहे. बेवारस अवस्थेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज शासकीय सेवेपर्यंत पोहोचला आहे. त्यांचे हे यश केवळ वैयक्तिक यश नसून प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढू पाहणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.




परिस्थिती माणसाचे भविष्य ठरवत नाही, तर जिद्द आणि मेहनत त्याचे भविष्य घडवतात, हे मंगला भिवंडीकर यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT