जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर गोव्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू
“

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेला यश; गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आणि संकल्पक मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत लोकार्पण संपन्न

महाराष्ट्र राज्यातील गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी वरदान ठरलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर आता गोवा राज्यातही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू करण्यात आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मा. डॉ. प्रमोदजी सावंत यांच्या शुभहस्ते आज पणजी येथे या कक्षाचे लोकार्पण संपन्न झाले. आरोग्यदूत आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचे मूळ संकल्पक मंगेश चिवटे यांना या कार्यक्रमासाठी गोव्यात विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यामुळे गोवा राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक सहाय्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी १७ मार्च २०१५ रोजी महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे प्रथमतः मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष सुरू करावा अशी संकल्पना मांडली होती. ही योजना महाराष्ट्रात लोकप्रिय झाल्यानंतर इतर राज्यातही महाराष्ट्र मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या धर्तीवर ही योजना सुरू व्हावी यासाठी योजनेचे मूळ संकल्पक आरोग्यदूत मंगेश चिवटे हे परिश्रम घेत आहेत. यासाठीच त्यांनी काही महिन्यांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री मा. डॉ. प्रमोदजी सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन गोवा राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी हा कक्ष सुरू करण्याची संकल्पना मांडली होती. या प्रस्तावाला मुख्यमंत्री सावंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर गोवा राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या उपक्रमाला मंजुरी देण्यात आली आणि आज या संकल्पनेचे प्रत्यक्षात रूपांतर झाले.

या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्यातर्फे गोवा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाला एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. गोवा राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मदत मिळावी, या सामाजिक बांधिलकीतून हा धनादेश देण्यात आला.

महाराष्ट्रात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत मिळाली आहे. याच यशस्वी कार्यपद्धतीच्या धर्तीवर गोव्यातही स्वतंत्र वैद्यकीय सहायता निधी कक्ष सुरू झाल्याने आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे मूळ संकल्पक तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.

महाराष्ट्रात रुजलेली गरजू रुग्णांच्या सेवाभावाची संकल्पना आता गोव्यातही साकार झाली असून, या उपक्रमामुळे गोव्यातील अनेक रुग्णांना उपचारासाठी नवी आशा मिळणार आहे.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार
सामाजिक

कुडाळ शहरातील मोकाट गुरांच्या समस्येवर उपाययोजना; दत्तनगर येथे १५ लाखांचा कोंडवाडा उभारणार

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा
सामाजिक

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र
देश

वेंगुर्ल्यात देशातील पहिले बहुप्रजातीय मत्स्यबीज उत्पादन केंद्र

ANCHOR AD SLOT