जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

वेंगुर्ला तालुका शिवसेनेची मासिक बैठक १२ नोव्हेंबरला

दादा सारंग • 11 November 2026, 07:29 AM

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : शिवसेना वेंगुर्ला तालुक्याची मासिक बैठक गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सप्तसागर बिल्डिंग येथील शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आली आहे.




ही बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर आणि उपसभापती सचिन देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.




या बैठकीला वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच सर्व शिवसैनिकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळा दळवी यांनी केले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)