जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

देश आणि संस्कृती टिकली तरच पदवीधर शिक्षक टिकतील आमदार प्रमोद जठार

दादा सारंग • 16 October 2026, 06:53 AM

राधानगरी प्रतिनिधी ✍️:भारतीय जनता पार्टीच्या राधानगरी तालुका कार्यालयात पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने प्रचार बैठक उत्साहात संपन्न झाली.

यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी देशहित,राष्ट्रवाद आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. देश आणि संस्कृती टिकली तरच पदवीधर शिक्षक टिकतील

तसेच बदलत्या काळानुसार Gen-Z पिढीसमोरील शिक्षण, रोजगार आणि तंत्रज्ञानविषयक आव्हाने समजून घेऊन त्यावर प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले.पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांना विजयी करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मतदारांशी थेट संवाद साधत एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजपचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)