जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
राजकीय

कर्जत येथे शिवसेना ठाकरे गटाची २५ ऑक्टोबरला बैठक व पक्षप्रवेश सोहळा

दादा सारंग • 24 October 2026, 07:27 AM

कर्जत प्रतिनिधी ✍️: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कर्जत तालुका कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक तसेच विविध पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. कर्जत येथील शिवालय कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.




तालुका कार्यकारिणीची बैठक सकाळी ११ वाजता होणार असून, त्यानंतर दुपारी १२ वाजता पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या बैठकीला पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित राहणार आहेत.




या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाददादा भोईर, रायगड जिल्हाप्रमुख मनोहर शेठ भोईर, रायगड जिल्हा संघटिका सुवर्णा ताई जोशी आणि कर्जत विधानसभा उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.




कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कर्जत तालुका प्रमुख बाजीराव भागा दळवी, तालुका संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर, तालुका संघटक माधव कोळंबे, तालुका सचिव रामदास घरत, तालुका संघटिका करुणाताई बडेकर, युवासेना विधानसभा अधिकारी संपत हडप, युवासेना तालुका अधिकारी प्रथमेश मोरे, कर्जत शहरप्रमुख निलेश घरत, नेरळ शहरप्रमुख बंडू क्षिरसागर आणि माथेरान शहरप्रमुख कुलदीप जाधव हे निमंत्रक म्हणून कार्यरत आहेत.




बैठक आणि पक्षप्रवेश सोहळ्यास संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)