सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ :जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली. यावेळी दुष्काळ निवारणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि शासनाकडून आवश्यक असलेल्या अतिरिक्त मदतीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, अधिकारी चव्हाण आणि अधीक्षक अभियंता श्री. पाटील यांच्याशी सिंचन प्रकल्पांची सद्यस्थिती, धरणातील पाण्याचा योग्य वापर आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आवश्यक नियोजन याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. यासोबतच जिल्हा परिषद शाळा टिकवून त्यांचे आधुनिकीकरण करणे आणि विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत आधुनिक तांत्रिक शिक्षण उपलब्ध करून देण्यावरही भर देण्यात आला.