जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

युवा नेते विशाल परब पुरस्कृत रील्स स्पर्धेत वासुदेव खडपकर प्रथम

दादा सारंग • 02 November 2026, 02:31 PM

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासोबतच स्थानिक कलागुण, सर्जनशीलता आणि डिजिटल माध्यमातील कौशल्यांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्ला आणि लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लक्ष्मी आधार उद्योजिका मेळावा महोत्सव २०२६’ अंतर्गत युवा नेते विशालभाई परब पुरस्कृत रील्स स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून वासुदेव खडपकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत ५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.




द्वितीय क्रमांक दत्तराज कामतेकर यांनी मिळवत ३ हजार रुपयांचे, तर अनंत गावडे (मालवणी आबा) यांनी तृतीय क्रमांक पटकावत २ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांकासाठी तुषार रेडकर यांना १ हजार रुपये, तर उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांकासाठी दिव्या बागायतकर यांना १ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.




डिजिटल युगात सोशल मीडिया हे केवळ मनोरंजनाचे माध्यम न राहता कला, विचार, कौशल्य आणि कल्पकता व्यक्त करण्याचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. हीच बाब लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या रील्स स्पर्धेत विविध विषयांवरील आशयपूर्ण आणि कल्पक रील्स सादर करण्यात आल्या. स्पर्धकांनी आपल्या सर्जनशीलतेचा आणि कलागुणांचा प्रभावीपणे आविष्कार करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.




‘लक्ष्मी आधार उद्योजिका मेळावा महोत्सव २०२६’मध्ये आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उद्योजकता, कला आणि डिजिटल माध्यमांचा सकारात्मक वापर यांचा सुरेख मेळ साधणारा हा उपक्रम महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरला. विजेत्या स्पर्धकांचे आयोजक संस्थांच्या वतीने अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.




यावेळी लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. ज्योती देसाई, सचिव सौ. वृंदा गवंडळकर, खजिनदार डॉ. दिपाली देसाई, सदस्य सौ. शुभदा नवार, सौ. आकांक्षा परब, काजल गिरप आणि दिपाली अभ्यंकर उपस्थित होत्या.




इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाच्या सचिव सौ. श्रीया परब, उपाध्यक्षा सौ. सई चव्हाण, एडिटर सौ. आरती गिरप, सदस्य सौ. रसिका मठकर, ॲड. अनुराधा वेर्णेकर, सौ. वैभवी दाभोलकर आणि सौ. हर्षदा शिरसाट यांनीही उपस्थित राहून स्पर्धकांचे कौतुक केले.




दोन्ही संस्थांच्या संयुक्त पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील कलागुणांना प्रोत्साहन मिळाले असून, विविध क्षेत्रातील व्यक्तींना आपली कला, कौशल्य आणि सर्जनशीलता डिजिटल माध्यमातून सादर करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)