सावंतवाडी प्रतिनिधी ✍️ भाजपा युवानेते विशाल परब यांनी सावंतवाडी येथील लता लॉज कॉर्नर येथील नवरात्रोत्सवाला भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत युवामोर्चा सावंतवाडी अध्यक्ष हितेन नाईक, आंबोली मंडल अध्यक्ष विनेश तावडे, स्वप्नील राऊळ, केतन आजगांवकर,धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते. मंडळाचे हे ३६ वे वर्ष आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष सत्यवान बांदेकर, श्रीकांत म्हापसेकर, अतुल पेंढारकर, संतोष मुंज, नंदू गावकर, नितीन मुंज, शैलेश गवंडळकर, प्रसाद देऊलकर, विशाल वाडकर, बाबू मेस्त्री, दत्ता सावंत यांनी युवा नेते सावंतवाडी मतदार संघाचे कार्यतत्पर युवा नेतृत्व युवा उद्योजक विशाल परब यांचे स्वागत करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.