सावंतवाडी प्रतिनिधी ✍️:भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात आणि दिमाखात संपन्न झाला. भाजपचे सहप्रभारी तथा खासदार सदानंदशेठ तानवडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
वाढदिवसाचे निमित्त साधत समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा संकल्प या उपक्रमातून अधोरेखित झाला. आरोग्यसेवेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे सावंतवाडी परिसरात आरोग्यविषयक जनजागृतीला चालना मिळण्यास मदत होणार आहे.
या उद्घाटन सोहळ्याला भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांच्यासह सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, नगर परिषदेच्या सभापती दीपाली भालेकर, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, सभापती आनंद नेवगी, मोहिनी मडगावकर, मनोज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवेचा वसा जपत आरोग्यसेवेला दिलेले प्राधान्य हा या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण संदेश ठरला. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नाला सावंतवाडीत विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.