कुडाळ प्रतिनिधी✍️ जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान, नाणिजधाम यांच्या वतीने आयोजित ‘वसुंधरा पायी दिंडी’ ही पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारी एक अभिनव सामाजिक चळवळ आहे.
या पायी दिंडीच्या माध्यमातून समाजप्रबोधनासोबतच पर्यावरणाचे संवर्धन, वृक्षलागवड आणि निसर्गाचे रक्षण करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला जात आहे. याच अनुषंगाने वसुंधरा पायी दिंडी शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर येथे दाखल झाली असता, शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होत असून, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
वृक्ष लावा, वृक्ष जगवा; पर्यावरणाचे रक्षण करा
पर्यावरणाचे संवर्धन ही काळाची गरज असून, भावी पिढ्यांना स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार पर्यावरण देण्यासाठी प्रत्येकाने वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
एक पाऊल निसर्गासाठी एक वृक्ष भविष्यात आपले संरक्षण करेल अशी प्रतिक्रिया बोलली जात आहे.यावेळी जिल्हा उपाध्यक्ष दादा साई जगद्गुरु श्रीमद् नरेंद्र महाराज संस्थानचे पदाधिकारी भक्त परिवार ग्रामस्थ पदाधिकारी, भक्तसेव आदी उपस्थित होते.