जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सांस्कृतिक

वेंगुर्ल्यात ऑनलाइन संस्कार भारती रांगोळी स्पर्धेचे आयोजन

दादा सारंग • 25 October 2026, 06:27 AM

वेंगुर्ला प्रतिनिधी✍️: शिवप्रेमी मित्र मंडळ, माणिक चौक, वेंगुर्ला यांच्या वतीने दीपावलीनिमित्त ‘दिपावली विशेष ऑनलाइन संस्कार भारती रांगोळी स्पर्धा २०२६’ आयोजित करण्यात आली आहे. दीपावली व लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ८ नोव्हेंबर रोजी संस्कार भारती पद्धतीची रांगोळी काढून स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.


स्पर्धेसाठी रांगोळी ही स्पर्धकाने स्वतः काढलेली असणे आवश्यक आहे. रांगोळी अर्धी असताना एक फोटो किंवा व्हिडिओ तसेच रांगोळी पूर्ण झाल्यानंतर एक फोटो किंवा व्हिडिओ पाठवणे बंधनकारक आहे. पूर्ण रांगोळीसोबत स्पर्धकाचा एक फोटोही पाठवावा लागणार आहे. रांगोळीच्या खाली स्पर्धकाचे नाव व मोबाईल क्रमांक लिहिणे आवश्यक असून, प्रवेशासाठी नाव, मोबाईल क्रमांक आणि पूर्ण पत्ता देणे बंधनकारक आहे.


स्पर्धकांनी आपले फोटो व व्हिडिओ ९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत पाठवावेत. कॉपी केलेली अथवा इतरांची नक्कल केलेली रांगोळी स्पर्धेसाठी ग्राह्य धरली जाणार नाही.


स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.


स्पर्धेचा निकाल १० नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता जाहीर करण्यात येईल. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता माणिक चौक, वेंगुर्ला येथे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे. स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.


स्पर्धेसाठी फोटो व व्हिडिओ पाठविण्यासाठी प्रथमेश यंदे (मोबाईल : ९९२३४८२५५८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)