जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
सामाजिक

दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रे’चे आयोजन

दादा सारंग • 06 October 2026, 05:25 PM

सेवाभावाची अनोखी भेट

पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा नेते मा. श्री. विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग बांधवांसाठी ‘देवदर्शन आनंद यात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे.

आज भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या आनंद यात्रेचा शुभारंभ झाला. दिव्यांग बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद फुलविणारी ही यात्रा त्यांच्या श्रद्धेला आणि सेवाभावाला समर्पित आहे.

सर्व सहभागी दिव्यांग बांधवांची ही देवदर्शन यात्रा सुखकर, आनंददायी आणि मंगलमय होवो, हीच मनःपूर्वक सदिच्छा यावेळी व्यक्त केली जात आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)